सुनीता विल्यम्सच्या निमित्ताने... मराठी शिणुमा
पृथ्वी... ओढ एका घराची ! ( सुनीता विल्यमच्या यशस्वी आगमनावर आधारित , ज्ञान आणि श्रद्धा यांचा संगम दाखवणारा आगामी मराठी चित्रपट... ) कथा सूत्र - कथानायक अंतराळवीर आहे. (आपण त्याचं नाव सुबोध ठेऊया!) तो ‘खगोलनायक महायोगी ग्रहगोलाधिपती वाकडे बाबा ’ यां चा परमभक्त आहे. त्यामुळे त्याच्या अंगी दिव्य शक्ती आहेत. बाबांचाच अंगारा लाव ल्यामुळे नासामध्ये भरती झाला आहे. अर्थात हे सुरवातीला नासाला माहितच नसते. पण एकदा शनीच्या कड्यांमधून येणारे किरण सुबोध केवळ साध्या डोळ्यांनी बघून ओळखतो तेव्हा नासाला याची प्रचिती येते. इ थे शिणुमाची टायटल्स येतात आणि मग कथा फ्लॅशबॅकमध्ये शिरते. सुबोधच्या आईला ( तिचं नाव निवेदिता असावं ) तिच्या नवऱ्याने (सयाजी ? ) फसवले आहे. सयाजी पक्का नास्तिक आणि दारूडा आहे. तेव्हा पासून आई पोलीस असलेल्या अशोकमामांच्या सहाय्याने राहते आहे. ते दोघंही वाकडे बाबांचे भक्त आहेत. इथे बाबांचे भक्तीपर गाणे - वाकडे वाकडे , बाबा वाकडे , ग्रहमान झाले फाकडे फाकडे.... सुबोधचे सोसायटीतल्या अमृताशी लग्न ठरले आहे. परंतू शनी आणि गुरूच्या पंचमस्थानात मंगळ येत असल्याने ते अडले आहे. हे स्थान हलवण्...