मिक्स अॅण्ड मॅच
गोष्टी म्हटलं तर साध्याच असतात. पण चाकोरीच्या बाहेर इंचभर सरकलेल्या.
तुमच्या बाबतीत असं घडतं की नाही मला माहित नाही. नक्कीच घडत असणार पण कुणी पटकन्
कबूल करणार नाही. असा वेडेपणा झटकूनच टाकायचा असतो आपल्याला.
होतं असं की दोन कुठल्यातरी संपूर्णतः वेगळ्या गोष्टींचा संबंध आपलं
‘हेड’ऑफिस काहितरी केमिकल लोचा करून जोडून टाकतं. मिक्स अॅण्ड मॅच. हे विचित्र
मॅचिंग इतकं पक्कं असतं की तोडू म्हणता तुटत नाही. अचानक कधीतरी आपला मेंदू आपल्या
ऑर्डर्स ऐकेनासा होतो. आपण गाफिल आहोत असं बघून आमनेसामने येऊन पुढ्यात अशा
मॅचिंगची जंत्रावळी टाकतो.
उदाहरणार्थ -
मला लहानपणापासून कोबीची भाजी आवडत नाही. कुठेतरी वाचलं होतं की ती
सांडपाण्यावर तयार करतात. आता मला सांडपाणी दिसलं की कोबीच्या भाजीचा वास येतो. हे
एकवेळ जरा लॉजिकल तरी आहे. पण ब्लेडने नुकत्याच टोक केलेल्या शिसपेन्सिलीच्या गुळगुळीत
तिरप्या कडांना स्पर्श करताना माला सिन्हाची आठवण का व्हावी?
रेडिओवरचं एखादं गाणं ऐकताना आपल्याला त्या सिनेमाची, किंवा
अगदी आपल्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या प्रसंगाची आठवण होणं एकवेळ स्वाभाविक आहे.
पण पूर्वी साडेअकरा वाजताचा शेवटचा कार्यक्रम संपला की
मला रेडिओची खरखर ऐकायला आवडायची. का ते सांगता नाही येणार. इतकी चांगली गाणी
ऐकवणारा रेडिओ माझ्याच्यानं पटकन् बंद करवत नसेल म्हणूनही असेल कदाचित. ती खरखर
ऐकताना मला उगाचच आपण कुणाला तरी रेल्वेस्टेशनवर जाऊन निरोप देतोय असं वाटायचं.
हुरहुर का काय म्हणतात तसलं फिलींग. मग तो आवाज हळूहळू बंद करत न्यायचो. अनेक वर्ष मला खरखर ऐकू आली की रेडिओस्टेशनपेक्षा
रेल्वेस्टेशनच आठवायचं.
माझ्या खूप लहानपणी एक बाई अधूनमधून आमच्या वाड्यात यायच्या. गरीब कुटूंब.
एक मुलगा वेडसर, दुसरा टग्या. बाई फार कातावल्या होत्या. मी त्या बाईंना
भेटलोही असेन. चेहरा अंधूकसा स्मरतो. पण तो त्यांचाच असं नाही सांगू शकणार. आजी
सांगायची की त्या उदबत्त्या विकतात. आता का कोण जाणे, मला आज
इतक्या वर्षांनंतरही त्या वळणावर उदबत्तीचा दरवळ येतो.
आणि दरवेळी अगदी तसाच.
गणपतीत जर रिमझिम पाऊस पडला तर उगाचच 'चुरा लिया है तुमने जो
दिलको' हे गाणं घोळू लागतं. आकाशी रंगाच्या शर्टाचं नातं
माझ्या मुंजीशी आहे. अंगणात पडलेला प्राजक्त माझ्या आजोबांचं प्रसन्न स्मरण देतो.
इतकी वर्ष झाली शाळा सुटून पण आजही नवं पुस्तक आणि नवी वही यातल्या वासातला
सूक्ष्म फरक मी सांगू शकतो. कारण पुस्तकाच्या वासाशी आनंद जोडला गेलाय आणि वहिच्या
वासाशी टेन्शन. आता का ते नका विचारू.
स्पर्श, रंग, गंध, नाद
या सार्या अनुभवातली संगती मी अगदी ओढून ताणून लावूही शकतो. पण मला माझ्या 'मेंदूकुमार'ची
भीती वाटते. हा नकळत
अशा गाठी मारून ठेवतोे आणि आपण त्या सोडवत बसायच्या. त्याचं काम त्याच्या शिस्तीत
चालू असतं. ‘कसं काय करतोस रे बाबा’ असं त्याला वर विचारायचीही सोय नाही. तेही
कुठेतरी रेकॉर्ड करून भलत्या संदर्भाने सलत्या वेळी अंगावर फेकायचा. नकोच ते.
पण आत्ता मी त्याला रंगे हाथ पकडलाय.
परवा एक नवचित्रकलेचं प्रदर्शन पाहिलं. अर्थ लावायचा नाही असं ठरवून ते
पहायचं असतं हे आता मला समजायला लागलंय. पण त्यातल्या एका चित्राचं नातं कदाचित
माझ्या एका स्मरणाशी बांधलं जातंय असं वाटतंय. कुठलं तरी उत्तर मिळतंय किंवा एक
नवीन प्रश्न तयार होतोय. या मिक्स अॅण्ड मॅचच्या खेळाची मजा यायला लागल्येय.
दोन्ही गोष्टी एवढ्या तरल आहेत की उमजेपर्यंत कदाचित सारं विरूनही जाईल.
आता घटना, व्यक्ती, रंग, गंध, वेळा यांच्या
‘जोड्या लावा’च्या खेळात एका पार्टीत मी आहे आणि दुसर्या पार्टीत माझं मन....
हे 'मिक्स अॅण्ड मॅच' मात्र फारच विचित्र आहे !
... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
माझे आणि बर्याच जणांचे असेच मिक्स आणि मॅच होत असाव. जसे, उदबत्ती आणि डेड बॉडी हे माझ्या डोक्यात.
ReplyDeleteखुप छान , nostalgic झालो वाचून
Deleteवा मस्त लिहिलंयस , या निमित्ताने आता असा विचार चालू करून काही सुचलं तर नक्की लिहितो
Deleteअशी एक गोष्ट चटकन आठवली म्हणून सांगतो ,लहानपणी रेडिओ ऐकणं हा एक छंदच होता. खुप रेडिओ ऐकायचो. त्यात लता बाई आणि रफी साहेब यांचा एक छान प्रसिद्ध गाणं लागायचं " छुप गये सारे नजारे " .. यातल्या एका ओळीमध्ये अंबुवाकी डाली पे गाए मतवाली .. च्या ऐवजी ती ओळ मला "अंबुवाकी डाली पे गाय मतवाली " अशीच वाटायची .. म साहजिकच पुढे विचारांचा गोंधळ .. की गाय का झाडावर चढली आणि म कोकीळ पण तिकडेच असं काहीतरी ... अर्थात हे लहानपणचं वेगडळ 😀😉
पटकन आठवलं म्हणुन ..
खरंय...
Deleteखूपदा घडतं असं... एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीशी, वास्तूशी, स्थळाशी, प्रसंगाशी, घटनेशी, काळाशी घट्ट बांधून ठेवते मनाला... त्यांतून मुक्त होणं बहुतेक वेळा मनालाही नको असतं... पण यात मेंदू फक्त हार्डवेअर म्हणून वापरला जातो असं वाटतं मला.
वा वा प्रविण ...खूप छान आणि सोपं लिहिलेलं आहे...
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसगळ्यांच्या मनातील हा कप्पा तु उघडलास आणी आठवणींच्या जोड्या लावणे सुरु झाले...
ReplyDeleteI kept thinking about similar experiences for me but couldn’t remember any other than every time I hear the song ‘ये जो देस है तेरा' from स्वदेश, it brings tears in my eyes
ReplyDeleteThe other thing that it reminded me of was people like the New zealand singer Lorde who associates colors with musical notes.... synesthesia.... It may be an advanced stage of what you experience...
Prasad
Nice i love it
ReplyDeleteप्रवीण खरच खूपच छान आणि समर्पक शब्दानं मध्ये तुम्ही हे सर्व लीहले आहे....
ReplyDeleteवाह मित्रा मनातल्या मनात आपापली यादी करू लागलो. शेवटाला "गुलज़ार" touch दिलायस
ReplyDeleteप्रवीण, खुप छान. बहुदा प्रत्येकाच्या मनात असं काहीसं मंथन सुरु असतं. तुझ्यासारखा एखादा ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
ReplyDeleteकोबी लहानपणापासून माझ्या आवडीची पण आमच्या नागपूर शहराचा मल मुत्र वाहून घेऊन जाणा-या नाग नदी काठावरच्या कोबीच्या वाड्या बघीतल्या नंतर कोबीची अोढ आटली.
प्रविण दादा खुप छान लिहीतोस तु
ReplyDeleteहे वाचताना माझ्या पण मनात खूप प्रसंग आले
सधया काळी टिव्ही वरील मराठी बातम्या लागणयाच्या वेळी लागणारे संगीत व त्याच दरम्यान आजीनी लावलेल्या कुकरच्या शिट्ट्या व तो वरण भाताचा घमधमाट .
आता कुकर , शिट्टा , वरणभाताचा घमघमाट ,आहे पण त्याच्या सोबत बातम्यांच गीत हरवले आहे
हेमांगी पेठे
Deleteखूप छान लिहिलं आहे।
ReplyDelete~अमेय निसळ
वा प्रविण वा, अनेक गोष्टींना उजाळा मिळाला.
ReplyDeleteतुम आ गये हो.... मूड (नूर) आ गया है
ReplyDeleteत्या काळी.काही लोक रात्री रस्त्यावर पेटी वाजवून पोट भरायचे
ओ.पि चे एक गाणं मला असं ऐकू यायचं
बडे भूके है ईक रात के..?... बाबूजी धीरे चलना
Pravin you created a nostalgia indeed
अगदी खरं. किती एक घटना अशा तुकड्यातुकड्याने मनाला सतावत रहातात.
ReplyDelete