कंटाळा

तसे तिथे आम्ही दोघंच असतोम्हणजे तिसरं कोणी दिसत तरी नाही.

‘‘कायदेव वगैरे मानतोस की नाही?’’ तो विचारतोकंटाळा आल्यावर टाईमपास करायला ह्यासारखा प्रश्न नाही.

‘‘.....’’ मी म्हणतो

उत्तरच दिलं नाही म्हणजे प्रश्न सुटतोप्रश्न नाही सुटला तर आपण तरी नक्की सुटतो

‘‘पुजा वगैरे?’’ तो विचारतो.

‘‘.....’’ मी पुन्हा सुटकेचं उत्तर देतो.

‘‘शेवटी श्रद्धा हवीच कशावर तरी.’’ तो पाठ केल्यासारखं म्हणतो.

‘‘हो ना.’’ मलाही हे दर वेळी म्हणावंच लागतं.

‘‘पण आजकाल देवाला न मानणं फॅड झालंय’’ विषयाला रेटा देत हे कदाचित तोच म्हणतो

‘‘तू मानतोस?’’ हे कोण म्हणतं आठवत नाही.

‘‘देव तर सगळीकडेच आहे’’ नुसताच घुमल्यासारखा आवाज येतोयावर जनरली कोणीच काही बोलत नाहीनुसती शांतता.... त्या शांततेनंतर पुन्हा एकदा शांतताबोअर झाल्यावरची शांतता गाभाऱ्यासारखी असते.

‘‘तुझ्यातमाझ्यातह्याच्यातत्याच्यातकणापासून मणापर्यंतमनीपासून मन्यापर्यंत सगळीकडे आहे.’’ पुन्हा आवाज चालू.

‘‘म्हणजे सारं काही पेअर्ड आहेपेअर्ड बट नॉट कनेक्टेड’’ (मुद्दा पटवून देण्यासाठी इंग्रजीतून तांत्रिक विषयावरचा विनोद आवश्यक)

‘‘मग तू मानतोस की नाही देव?’’ 
आमच्यापैकीच कोणीतरी एक म्हणतो

‘‘विचार करावा लागेल’’ पैकोदुसरा म्हणतो.

‘‘विचार काय करायचा त्यात? देव आहेच’’ 

‘‘तुझ्यातही आहे?’’

‘‘ऑफकोर्स’’ आवाजातला कॉन्फिडन्स वाढलेला असतो.

‘‘पुरावा काय?’’

‘‘मीच’’ तो

‘‘मी?’’ मी

‘‘मी म्हणजे मीतू नाही मी.’’ तो

‘‘अच्छामी म्हणजे मीमी म्हणजे तू नाही.’’

‘‘कन्फ्यूज करू नकोसतो माझ्यातच असतोतो म्हणजेच मी.’’

म्हणजे तोच जर माझ्यातही असेल तर मी म्हणजे तू... (हा आपला माझा विचार)

‘‘पण तू म्हणजे तो असशीलआणि तो माझ्यातही असेल तर मी म्हणजे तू नाअ बरोबर ब; आणि ब बरोबर क असेल तर अ बरोबर क हे आलंच ना.’’ मी म्हणजे कदाचित तो म्हणतोमी तर नुसतं ऐकतोत्याला (मला?) पटतं.

‘‘हं.... विचार करावा लागेल’’

‘‘का पण?’’ तो गंडतोय हे माझ्या लक्षात येतं.

‘‘तो दिसणार कसा हे शोधावं लागेल’’

‘‘आता हा ‘तो’ कोण?’’

‘‘देव रे’’

‘‘म्हणजे तू’’ ता तो जरा वैतागतो. (असं ‘मला’ तरी वाटतं)

‘‘शूऽऽऽ तिसरं कोणी ऐकतंय हे?’’

‘‘नाही.’’ 

तिसरं कुणी नसतंच ना तिथे.

‘‘म्हणजे देव नाही.’’ एक चिवट युक्तिवाद.

‘‘तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही.’’ 

लॉजिकचा स्टॉक संपल्यावर तो जायला निघतो.

‘‘थांबएकटं टाकून जाऊ नको.’’

‘‘इथे कोणीही एकटं नाही. तो आहेच ना सगळीकडे.’’ तो (मी?)

.......

हे असंच चालू राहतं. आम्ही बोअर झालो हा खेळ लावतोचमग आमच्यापैकी कोणीतरी येतंकोणीतरी निघून जातंहातपाय दगडाचे असले की कंटाळा येणारच नामग आम्ही एकाचे दोन होतोदोनाचे चारचाराचे अनंत... देव मानणारादेव न मानणारामी, तो असा सगळा सबगोलंकार गोपाळकाला होतो. तसं एरवी तिथे कुणी नसतंच

मग गाभाऱ्यात उरतं कोण?

.....??

उरतं केवळ एक प्रश्नचिन्ह.
त्याला तुम्ही कंटाळून देव म्हणता...

 

... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. प्रवीण ...जे दिसतं ते असत नाही..जे असतं ते दिसत नाही..एकूण सर्व ख-याचे भास...की भासातले खरे

    ReplyDelete
  2. विश्वास पाहिजॆ तर सगळॆ साध्य होतॆ

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  4. वा.... Abstract विषय....आणि तोसुद्धा हलक्या फुलक्या शैलीत अतिशय effectively मांडलाय.... पण विचार करायला लावणारा....👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment