ॲज इट इज

आजचं हे व्हेग प्रकरण जरा जास्तच ‘कॉम्प्लिकेटेड’ आहेकॉम्प्लिकेटेड म्हणजे किती कॉम्प्लिकेटेडतर कॉम्प्लिकेटेड या शब्दाएवढं कॉम्प्लिकेटेड. त्यामुळे थोडं सावकाश वाचायला लागेलबट इट इज ॲज इट इज.

दोन गोष्टी.

एक - शाळेत कधीतरी फिजिक्सच्या तासाला शिकवलं होतंएखाद्या वस्तूवरून प्रकाश परावर्तीत होतो म्हणून ती आपल्याला दिसतेत्या प्रकाशकिरणांमधल्या काही फ्रिक्वंसीज् ती शोषून घेते आणि ज्या फ्रिक्वंसीज् बाहेर फेकते तशा रंगाची ती वस्तू दिसते.

आता सायन्सवर विश्वास ठेवला तर जोरदार कन्फ्यूजन चालूम्हणजे वस्तूला स्वतःचा असा रंगच नसतोजर प्रकाशच पडला नाही तर वस्तूंना रंगच नाहीम्हणजे सगळ्या वस्तू सारख्याच? मी आत्तापर्यंत समजत होतो की माझा रंग सावळा आहेमाझी गाडी निळ्या रंगाची आहेताजमहाल शुभ्र पांढऱ्या रंगाचा आहेकोकणातली माती तांबडी आहे.... हे सग्गळं खोटंम्हणजे आपल्या नजरेला सगळं तसं तसं दिसत असेलहीपण मुळात त्यांना रंगच नाहीयाचा अर्थआपण एका रंगहीन जगात राहतोपण रंगच नाही तर रंगहीन म्हणजे तरी काय?

जस्ट वेट.

दोन - जीएंच्या एका गोष्टीत (बहुधा ‘ठिपका’ असावीएका टेकडीवर दोन माणसं असतातत्यातला पहिला दुसऱ्याला सांगत असतो, ‘‘माझ्या टोपलीत पिवळ्या रंगाचा भंडारा आहे’’ पण प्रत्यक्षात त्या टोपलीत काळीकरडी राख असतेदुसरा माणूस त्यावर वाद घालतोपहिला म्हणतो, ‘‘आत्ता या टेकडीवर तू आणि मी सोडून तिसरं कोणी आहे का रंग ठरवणारंटोपली माझीमी सांगतो ते ऐक, यात पिवळ्या रंगाचा भंडारा आहे.’’ आणि कहर म्हणजेहे बोलणारा तो पहिला माणूस चक्क आंधळा असतो.

मी पुन्हा भिर्रफिजीक्सच्या प्रश्नाचं उत्तर जीएंकडे सापडतंय असं वाटेपर्यंत पुन्हा कन्फ्यूजनम्हणजे आपण रंग बहुमताने ठरवतोत्यातही तो तिसरा अदृश्य माणूस महत्त्वाचामग शेवटी आपण सगळे मिळून रंग न ठरवता त्यांची नावंच ठरवतोआता काय ह्याला लाल म्हणा, याला हिरवा म्हणा. निळाकाळा पिवळा म्हणाबरंपुन्हा ही नावंही रंगांची नाहीतच; ती असतात प्रत्येकाच्या अनुभवांची. (कारण रंग तर नाहीतच नाआपल्यापेक्षा रंगांधळे सुखी. त्यांच्या वाट्याला निदान हे कन्फ्यूजन तरी नाहीपण असं म्हणावं तर त्यांना रंग न दिसल्याचं दुःख. (म्हणजे जे नाहीये ते न दिसल्याचं दुःख!) 

डोकं असं भरकटायला लागलं कीरंगांचं सोडामला तर समोर जे दिसतंय ते तरी खरं आहे का अशी शंका यायला लागतेकारण रंगांवरचा विश्वास उडाला की आकारांवरचाही उडणारआकारांवरचा उडला की अवकाशावरचा उडणार... मग तर डोळे उघडे आहेत का बंद तेही कळणार नाही... ते चक्षुर्वैसत्यम् वगैरे सगळं खोट्यम्. रंगांचा अन् या डोळ्यांचा काहीच संबंध नसावा.

पुलंचे हरितात्या आंधळे झाल्यावर म्हणतात, ‘‘डोळे गेले, आता आतल्या आत पाहत बसतो’’. हे पाहणं कसं असतंगदिमांचं ‘अंधारी मी उभी आंधळी’ म्हणजे कायओशो म्हणतो, ‘भीतरमें झांकीये’ तेव्हा त्याला कुठला रंगकुठला आकारकुठला प्रकाश अपेक्षित असतोकदाचित नाहीच कळणार कधी.

आता कोणी रंगांचीआकारांचीदृश्यांची वर्णनं करायला लागला की मी डोळ्यांप्रमाणे कानही बंद करून घेतोकारण कोणत्याही वस्तूचं वर्णन ‘ॲज इट इज’ यापेक्षा अधिक चौथ्या शब्दांत करताच येणार नाही.... स्वीकारा किंवा नका स्वीकारू वर्ल्ड इज, ‘ॲज इट इज

......

...हो, पण ते तरी कुणी पाहिलंय?

 

... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. Today's subject is really complicated. We should think on it.

    ReplyDelete
  2. The Buddha saw it. The world.. As it is. And the world called him enlightened. He said.. Do nothing, just observe, as it is, and you are there. Stop seeing.. Easy.. Close eyes, stop listening.. Difficult..solution.. Find quiet place. Major hindrance.. Conditioned mind.. But mind is trainable.. To go beyond the भासमान सत्य. Step by step😇...
    Blog.. Very well pondered Pravin sir👍🙏👏

    ReplyDelete
  3. अस अकल्पित कसं सुचत तुला प्रवीण? खूप छान लिहिलं आहेस.

    अनुराधा मराठे

    ReplyDelete
  4. खूपच विचार करायला लावणारे लिखाण .

    ReplyDelete
  5. छान आहे. खरंच व्हेगळं आणि सहज.

    ReplyDelete
  6. एक abstract विषय, वरकरणी हलक्या फुलक्या शैलीत लिहिलेला, पण अतिशय impactful message देऊन जातो..... फारच छान...

    ReplyDelete
  7. प्रवीण...तुझं लिखीत वाचताना असं वाटलं की खरंच हे लिहीलं आहे का? लिहिलेलं असेल तर मी ते खरंच वाचतो आहे का?आणि असा संभ्रम निर्माण होत असेल तर हेच तुझ्या लिखीताचं यश असावं...

    ReplyDelete
  8. प्रवीण...तुझं लिखीत वाचताना असं वाटलं की खरंच हे लिहीलं आहे का? लिहिलेलं असेल तर मी ते खरंच वाचतो आहे का?आणि असा संभ्रम निर्माण होत असेल तर हेच तुझ्या लिखीताचं यश असावं...

    ReplyDelete
  9. व्वा! सुंदर लेख. जग मिथ्या आहे जोशी बुवा

    ReplyDelete
  10. क्लिष्ट....!! ... भन्नाट...!!😊👌

    ReplyDelete

Post a Comment