आऽऽय थिंक...
परवा मला कुणीतरी
विचारलं, ‘सुचणं म्हणजे काय?’
प्रश्न तसा अवघडच.
अशा प्रश्नांना उत्तर देताना चेहरा लांबुळका करावा. (यामुळे तुम्ही हुशार दिसता)
मान होकारार्थी आणि नकारार्थींच्या मधल्या अँगलने हळुहळू हलवावी. (यामुळे तुम्ही
विचारवंत वाटता) डोळे बारीक करून दीर्घ श्वास आणि एक मोठ्ठा पॉज घ्यावा, (तुम्हाला विचार करायला थोडा वेळ मिळतो) चष्मा असेल तर
काढून काचा पुसण्याची अॅक्शन करावी. (अज्ञान झाकलं जातं) चष्मा नसेल तर गालाखाली
हनुवटीशेजारी उगाचंच खाजवावं. (प्रश्न गहन वाटतो) हा सारा अभिनय जमला की जरासं
खाकरून ‘आऽऽय थिंक...’ या शब्दांनी वाक्याची सुरवात करावी (पण वाक्य कंप्लिट
करू नये) हे सारे उत्तर देण्याचे नव्हेत तर उत्तर देणं टाळण्याचे तोडगे आहेत.
तर त्याचा प्रश्न
होता, ‘सुचणं म्हणजे काय?’
मी वर सांगितलेले
अभिनयाचे सर्व प्रकार करून त्याला हजरजबाबीपणाच्या थाटात विचारलं, ‘मला सांग, तुला हे विचारावसं कसं सुचलं?’ तो बंद पडला. पण विकेट काढल्याच्या आनंदात असताना मलाच प्रश्न पडला की ‘मला हे कसं काय सुचलं?’ आता मी बंद पडलो.
आपण बोलतो. अगदी
सहजपणे बोलतो. वचावचा बोलतो. अगदी कृष्णाने गीता सांगावी तशा अविर्भावात बोलतो.
बोलताना शब्द शोधायला लागत नाहीत, वाक्य जुळवायला लागत नाही. हे शब्द, हे विचार सुचतात कुठे? येतात कुठून? आपलं प्रोसेसिंग सॉफ्टवेअर इतकं सॉलीड असतं? विदीन नो सेकंदस् वाक्यरचनेसकट
उत्तर किंवा प्रश्न तयार? मेंदू, मन, हृदय, बुद्धी, अक्कल, अंतःकरण वगैरे जी काही भानगड असेल ती लई भारी असणार.
पूर्वीच्या राजांच्या गुप्त खलबतखान्यासारखी आत खोल कुठेतरी.
एडी मर्फीचा कुठला
तरी सिनेमा पाहिला होता. त्यात तो खूप खड्डे पडलेल्या रस्त्यावरून खड्डे चुकवत वर
दिसणार्या तुकड्यांवरून मजेत उड्या मारत चाललेला असतो. खड्डे किती खोल आहेत याचा
अंदाज घेण्यासाठी एका खड्ड्यात नाणं टाकतो आणि कान लावतो. पण ते नाणं खाली कुठे
पोचल्याचा आवाजच येत नाही. ते खड्डे अनंत अथांग खोल असतात. तो चक्क सुळक्यांच्या
टोकांना रस्ता समजून चाललेला असतो. मला वाटतं, आपलं बोलणंही तसंच शब्दांच्या सुळक्यांवरून उड्या मारत मजेत चाललेलं असतं. पण या शब्दावरून त्या शब्दावर उडी मारताना जरा दोन
शब्दांच्यामध्ये खाली पहावं... टरकते...
एक अंधारी गूढ खोली
आ वासून बसलेली दिसते तिथे. तिच्यात असतात खूप शब्द, खूप विचार आणि तरीही निःशब्द गंभीर शांतता. शब्द काय, कृती काय, निर्णय काय... जे काही करायचं त्याचे आदेश या खोलीतून सुटतात. आपल्याही नकळत, आपल्याला हिंग लावूनही न विचारता. आपण निमूटपणे त्या
आदेशांची अंमलबजावणी करत असतो.
शास्त्रात म्हणे
वाचेच्या म्हणजे बोलण्याच्या चार अवस्था सांगितल्या आहेत. ‘परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी’. यातली वैखरी म्हणजे जीभ. सगळ्यात बाहेरची अवस्था. आणि
त्या आतल्या तळघराचं नाव ‘परा’. परा म्हणजे पल्याडचं. आपल्यापार दूर कुठेतरी असलेल्या ‘पर’तत्वानं आपल्याच आत
थाटलेलं हेडऑफिस. इथे आपण, ‘आपण’ नसतो... आपलं नाव, गाव, हुद्दा, वय, पत, ऐपत यांना काही अस्तित्वच नसतं. आपल्या आतून, कोणीतरी दुसराच शब्द पुरवत असतो. विचार सांगत असतो. भलताच कुणीतरी आपला पोपट
करून आपल्याला ‘बोलवित’ असतो.... हॅः! हे सारं फारच विचित्र आहे. अक्षरशः भीती वाटायला लावणारं आहे.
आजकाल मी जेव्हा
जेव्हा थाटात म्हणतो ‘आऽऽय थिंक’, तेव्हा तेव्हा एक प्रश्न येऊन टोचतो, माझ्याआतून ‘नक्की कोण थिंक’?
.......?
जाऊ दे... नकोच ते सुचणं.
काही सुचण ही भावनाच न उलगडणारी आहे
ReplyDeleteउत्तम आहे
ReplyDeleteआत्ता तरी एवढंच सुचलंय
मस्त
ReplyDeleteWaiting for another
ReplyDeleteWaiting for another
ReplyDeleteजमलंय
ReplyDelete-अद्वैत
वा प्रवीण मस्त... अगदी जी.ए.च्या पत्रांची आठवण झाली...
ReplyDeleteWah Wah Mastch....
ReplyDeleteSahich re dada...
ReplyDeleteSuperb thought
ReplyDeleteखुपच सुंदर...!!!
ReplyDeleteकाही suchna नको हे एकदम बरोबर आहे
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteHe ekdam bhareee ahe
ReplyDeleteवा छान...
ReplyDeleteखूप मस्त...
ReplyDeleteनकोच ते सुचणे असे नको म्हणूस कारण मग तुझा ब्लॉग कसा चालणार? Just joking
ReplyDeleteपण खूप छान👍👌
वा..
ReplyDeleteछान जमलंय...
हाच तो हरवलेला प्रवीण का?
ReplyDeleteमधली काही वर्षं लॉस्ट आणि आता फाउंड... 😁😁
मस्त लिहितोयस...
कसं सुचतं रे, असं विचारणार नाही कारण तुला असंच खूप खूप सुचतं..😂😂
Mast 👍
ReplyDeleteI think.. 😰 . Need to slow down the speed of reeling to observe and say nothing or to write .. Nothing.
ReplyDeleteReading takes some time, but to come out of it, takes long. Very intriguing. 👍
ReplyDeleteवा....फारच "सूचक" लिहिलंय... 👍
ReplyDeleteDon't think....Keep writing like this!😊
मी म्हणजे तोच साक्षी... हे उत्तर कसं सुचलं ते माहीत नाही
ReplyDeleteअप्रतिम!
ReplyDelete