लॉस्ट अॅण्ड फाऊंड
हा लॉस्टअॅण्ड फाऊंड म्हणजे सगळा गोंधळच आहे!
सहावीत असताना एकदा माझं खोडरबर हरवलं. गुलाबी रंगाचं, सेंटेड. मस्त
होतं. त्यावर मिकी माऊसचं चित्र होतं आणि एक बाजू टोकदार होती. आता एवढं वर्णन
हातात असल्यानंतर खोडरबर सापडणं अवघड नव्हतं. घरातले सगळे खण, वर्गातल्या सगळ्यांची दप्तरं शोधून झाली. मित्रांशी भांडून झालं. शाळेच्या
‘हरवले गवसले’च्या कपाटावर लिहून झालं. अजूनही ते सापडलेलं नाही. असेल कुठेतरी, असं म्हणून त्याचा विचार डोक्यातल्या अडगळीतल्या खोलीत टाकून दिला. का, तर पुन्हा दिसलं तर ओळख पटावी म्हणून. पण हरवलेल्या खोडरबराऐवजी दुसराच
प्रश्न छळायला लागला...
हे ‘कुठेतरी’ नेमकं असतं कुठे?
मध्यंतरी माझ्या एका मित्राचे वडील हरवले. वय पंचाऐंशी. स्मरणशक्ती अधू.
दिसायचं मान कमी. खोडरबराचं जाऊ दे; माणसासारखा माणूस हरवावा? तो कोणालाच सापडू नये? दिसू नये? समजा आपल्यासमोर असा एखादा मनुष्य आला तर आपण काय करू? आपलं सोडा, पोलीस तरी शोधतीलच की नाही? मित्राचे वडील अजूनही सापडलेले नाहीत. ते ‘कुठेतरी’ गेले.
पुर्वीच्या सिनेमात तो ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’चा फेमस फॉर्म्युला असायचा बघा.
लहानपणी बिछडलेले भाई थेट मोठेपणी भेटायचे. पण दोघंही जिथे बिछडायचे तिथलं सारं
सारं सिनेमात दाखवायचे. की बुवा, हा मुसलमानाकडे मोठा झाला आणि
हा हिंदूकडे. ‘हरवणं-सापडणं’ असलं तरी ‘कुठेतरी’ ही भानगड स्पष्ट होती.
नष्ट होणं एकवेळ मान्य आहे; पण हरवतं म्हणजे नेमकं काय होतं? कदाचित आपल्या दृष्टीला न दिसणारी एक प्रतिसृष्टी आहे. आपल्याच शेजारी, आपल्याचसारखी. पण आपल्याला तिथले कायदे माहित नाहीत. स्पेस, टाईमचे नियम माहित नाहीत. बर्म्यूडा ट्रँगलसारखं किंवा ब्लॅक होलसारखं
तिथे जे जातं ते कधी परत येत नाही. तिथे माझं खोडरबर असणार, मित्राचे हरवलेले वडील असणार. पण त्यांच्या आयडेंटीटीज् तेवढ्या हरवलेल्या
असणार. त्यांना ‘मै कहाँ हूँ’ झालं असणार. किंवा कदाचित त्यांच्या लेखी आपणच
‘कुठेतरी’ हरवलेले असणार आणि तेच आपल्याला शोधत असणार... मग आपण त्या ‘कुठेतरी’चा
पत्ता सापडला म्हणून आनंद करायचा? का परत जायची वाट
शोधायची?
हे असं लॉस्ट व्हायला होतं म्हणूनच ‘कुठेतरी’च्या वाटेला कुणी फारसं जात
नाही. त्या वाटांना चकवा म्हणतात आणि तिकडे जाणार्यांना वेडसर. या वेड्यांचं
घराबाहेर जाताना कायम कन्फ्यूजन. कारण दारावरच्या ‘आहेत-नाहीत’च्या सरकत्या
नेमप्लेटचं करायचं काय? म्हणजे समजा घराबाहेर जाताना पाटीवरच्या ‘आहेत’चं
’नाहीत’ केलं तर त्याला; ‘मी आहे ना पण! मै हूँ ना... आय ईज’
असा साक्षात्कार होणार. मग तो परत ‘नाहीत’चं ‘आहेत’ करणार. मग त्याला आपण घरात
आहोत का बाहेर हेच नाही कळणार. मग तो ना धड लॉस्ट असणार, ना धड फाऊंड असणार. मग...
हॅः.. हे सारं फार भयानक आहे. असं काहीतरी वेडचक्र सुरू झालं की मी
आसपासच्या वस्तू दोनदोनदा चेक करतो. मित्रांना फोन करतो. ओळखीच्या खाणाखुणा बघून
ठेवतो.
हा लॉस्ट अॅण्ड फाऊंड म्हणजे सगळा गोंधळच आहे!
एवढा, की मला कळत नाहीये की आपण आत्ता लॉस्ट आहोत का फाऊंड?
... प्रवीण जोशी98505 24221pravin@pravinjoshi.com

Total confusion
ReplyDeleteI think म्हणूनच तुला GPS चा उपयोग होत नाही. ह्या लॉस्ट अँड फाऊंड वर मनमोहन देसाईंनी किती PICTURES ना!!!
पण हे जे ' कुठेतरी ' आहे ते खरंच सापडले तर किती बरे होईल ना?
ReplyDeleteमाझ्या "कुठेतरी" विश्वात गेलेल्या वस्तू / व्यक्तींच्या आठवणी जाग्या झाल्या.
ReplyDeleteखरोखरचं मिक्स व्हेग ....लीलया एकातून दुसऱ्या अनुभवाची सफर
ReplyDeleteसगळ्यात आवडंल शेवटंच वाक्य!!!!!
हरवले ते गवसले का, गवसले ते हरवेल का ?
ReplyDeleteयाची छान जाणिव !!!
कितीतरी गोष्टी, त्या 'कुठेतरी' मधे दडल्या आहेत काय माहिती
I'm fond of your last write-up. Adwait.
ReplyDeleteI'm fond of your last write-up. Adwait.
ReplyDeleteप्रवीण खूपच छान आणि स्तुत्य...प्रदीप प्रभुणे
ReplyDeleteहरवलेल्या गोष्टी , वस्तु वेळ परत आली तर किती बर होईल
ReplyDeleteMast. ..kuthetari..kadhitari..kasetari..kahihi karun..harwale te gawasale ka..gane athaawle..pan he harawane faaar gambhir vishay ahe re...chan jamalay
ReplyDeleteTotal confusion
ReplyDeleteहरवलेले हरवतं. सापडत नाही. पण ते कुठेतरी जातं... हे मस्त आहे.कुठेतरी कळलं पाहिजे.
ReplyDeleteNever ending thing imagination is .... खुपच सुंदर ! . . .
ReplyDelete